एकाच मंडपात सुरू होती सख्ख्या बहिणींच्या बालविवाहाची तयारी

Share This News

अमरावती : दोन अल्पवयीन बहिणींचं एकाच मांडवात लग्न लावून देण्याचा प्रकार मोर्शी तालुक्यात नुकताच उघडकीस आला आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्षानं तातडीनं हालचाली करत हा विवाह रोखला आहे.
जन्मातारखेबाबात विचारणा केली, परंतु त्यांनी जन्मातारीख माहीत नसल्याचे सांगितले. दरम्यान अंगणवाडी केंद्रातून अधिकाऱ्यांनी या मुलींची जन्मतारीख शोधली असता, मोठी मुलगी विवाह योग्य होण्यासाठी तिचं वय तीन महिन्यांनी कमी पडत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं लहान बहिणीची जन्मतारीख शोधण्याचा प्रश्नच नव्हता. असा विवाह कायद्यानं गुन्हा असल्यानं अधिकाऱ्यांनी मुलींच्या पालकांना सांगून होणारा विवाह रोखला. बालविवाह रोखल्यानंतर अधिकाऱ्यांनी पालकांना समज देऊन त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतलं.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.