राज्याच्या अर्थसंकल्प मे महिन्यात मांडवा : मुनगंटीवार

Share This News

नागपूर : कोरोनाचा प्रभाव राज्यात वाढत असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. सरकारने यासदंर्भात घाई न करता अर्थसंकल्पीय अधिवेशन मे महिन्यात घेऊन तात्पुरते फक्त लेखानुदान मांडावे, अशी मागणी भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
अधिवेशन नेमके किती आठवड्याचे घ्यायचे याविषयी सरकारच्या मनात संभ्रम आहे असे मत मुनगंटीवार यांनी मांडले. मुंबईत रुग्ण वाढत असल्याने अधिवेशन एकाच आठवड्याचे घ्या, लेखानुदान मांडा याआधी आपण किमान १५ वेळा लेखानुदान मांडले आहे. आधी तातडीने सगळे अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, पोलिस, विधिमंडळाचे कर्मचारी यांना लसीचे दोन डोस देण्यात यावे. त्याचा कालावधी मे महिन्यापर्यंत पूर्ण होतो. त्यानंतरच पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जावा, असा प्रस्ताव आपण उद्याच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मांडणार असल्याचे मुगगंटीवार म्हणाले.
सध्या स्थितीत राज्याचा आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी व अर्थचक्राची मंदावलेली गती पुन्हा वेगाने मूळपदावर आणण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्याची गरज आहे. यंदाचा अर्थसंकल्प लोकप्रतिनिधींनी जनतेच्या आशा-आकांक्षासह मांडणे गरजेचे आहे, अधिकाऱ्यांची भूमिका त्यात नसावी. यावर्षीच्या अर्थसंकल्पावर व्यापक आणि सविस्तरपणे चर्चा होणे आवश्यक आहे. त्यामुळे घाईत अर्थसंकल्प मांडल्यामुळे त्यातून फक्त राज्याचेच नुकसान होईल, असे मुनगंटीवार म्हणाले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.