अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.-president-barack-obama-attacked-trump-saying-he-who-cannot-save-himself-he-will-not-save-us-all-

Share This News

जी व्यक्ती कोरोनापासून स्वत:चा बचाव करु शकली नाही, ती आपल्या सर्वांना वाचवणार नाही, अशा शब्दांत ओबामांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला.

नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. जी व्यक्ती कोरोनापासून स्वत:चा बचाव करु शकली नाही, ती आपल्या सर्वांना वाचवणार नाही, अशा शब्दांत ओबामांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. बराक ओबामा राष्ट्र अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांचा प्रचार करत आहेत. (Barack Obama attacked Trump saying he who cannot save himself he will not save us all)

फिलाडेल्फियामधील लिंकन फायनान्शियल फिल्ड येथे ओबामा यांनी सभेला संबोधित केले. ओबामा जो बायडेन यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. ओबांमांनी कोरोनावरून ट्रम्पं यांच्यावर निशाणा साधला. कोरोना महामारी देशात 8 महिन्यांपासून आहे. देशात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. ट्रम्प आपल्याला वाचवू शकत नाहीत. या महामारीमध्ये कोरोना विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यातही ते अपयशी ठरले आहेत.

ट्रम्प यांनी कोरोना विषाणूला गांभीर्यानं घेतलं नसल्यामुळे त्याच्या होणाऱ्या परिणामांसह आपल्याला जगावे लागेल. हा काही रिअ‌ॅलिटी शो नाही, हे वास्तव आहे, असा टोला ओबामांनी लगावला.

गेल्या चार वर्षांपासून सोडली नव्हती, निराश होतो मात्र आशा सोडली नव्हती, असे ओबामांनी मतदारांना सांगितले. मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडून मतदान करा. आपण घेतलेला निर्णय आणि आगामी 13 दिवस पुढील अनेक दशकांवर परिणाम करणारे आहेत, त्यामुळे बाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन बराक ओबामांनी केलं आहे


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.