पोलिओ राष्ट्रीय लसीकरण दिनाचा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ

Share This News

नवी दिल्ली, 30  जानेवारी

जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी राष्ट्रपती भवनात सकाळी काही मुलांना प्रातिनिधिक स्वरूपात  पोलिओ लसीचे थेंब देऊन पोलिओ राष्ट्रीय लसीकरण दिनाचा  शुभारंभ  केला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पत्नी सविता,  केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन, राज्यमंत्री अश्विनी चौबे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

देशव्यापी कोरोना लसीकरणाच्या पार्शवभूमीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रपती कार्यालयाशी सल्लामसलत करून राष्ट्रीय लसीकरण दिन  “पोलिओ रविवार” 31 जानेवारीला  आयोजित करण्याचा निर्णय घेतला . 16 जानेवारी पासून  देशाव्यपी कोरोना लसीकरण कार्यक्रम देखील सुरु आहे. जगातील ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे.  कोरोना व्यवस्थापन आणि लसीकरण सेवा तसेच आरोग्य सेवा एकमेकांवर विपरित परिणाम न होता सुरु राहाव्यात या आरोग्य मंत्रालयाच्या  धोरणाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला .


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.