राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर,शारदाप्रसाद मिश्रा नागपुरातून एकमेव पोलीस अधिकारी
राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एकूण ५७ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ठ सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’,१३ पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता ४० पोलीस पदक जाहीर झाली आहेत. प्रशंसनीय सेवेकरिता प्रदान करण्यात येणारे पोलीस पदक नागपुरातील अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक शारदा प्रसाद मिश्रा यांना जाहीर झाले आहे. नागपूर पोलीस दलात पदक प्राप्त करणारे शारदाप्रसाद मिश्रा एकमेव पोलीस अधिकारी आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करण्यात येते. यावर्षी एकूण ९४६ पोलीस पदक जाहीर असून ८९ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवापदक’,२०५ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक,६५० पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत.यामध्ये महाराष्ट्राला एकूण ५७ पदक प्राप्त झाली आहेत. देशातील ८९ पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांना उत्कृष्ठ सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भ्रष्टाचार विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभात कुमार,फोर्स वन चे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ सुखविंदर सिंग,ठाण्याच्या गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त निवृत्ती कदम व शाहू नगर मुंबईचे पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाले आहे.
ReplyForward |