भंडारा आगीच्या घटनेमुळे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांनी व्यक्त केले दु:ख

Share This News

नवी दिल्ली,  9 जानेवारी

महाराष्ट्रात भंडारा अग्नी अपघातावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना रामनाथ कोविंद म्हणाले, “महाराष्ट्रातील भंडारा येथे लागलेल्या आगीत बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. ह्रदय पिळवटून टाकणा-या  या अत्यंत दुर्दैवी घटनेत आपल्या चिमुकल्यांना गमावणाऱ्या कुटुंबाप्रती मी शोक भावना व्यक्त करतो.”

तर उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, “महाराष्ट्रातील भंडारा येथील रूग्णालयाच्या आजारी-नवजात बालक उपचार विभागात लागलेल्या भीषण आगीत लहान मुलांचा मृत्यू झाला, हे ऐकून खूप दु:ख झाले. शोकाकुल कुटुंबीयांच्या प्रती मी शोक संवेदना व्यक्त करतो.”

भंडा-याची घटना  हृदयद्रावक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

भंडा-यात रुग्णालयात झालेल्या अग्नीप्रमादाच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शोक आणि दु:ख व्यक्त केले. ट्वीटर द्वारे  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “ महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील घटना  हृदयद्रावक आहे. आपण बहुमुल्य जीवांना गमावले. शोकग्रस्त परिवारास माझ्या संवेदना आणि जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावे ही आशा आहे.”


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.