ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी पंतप्रधानांचे तीन उपाय

Share This News

नवी दिल्ली
भारतात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनचा हा तुटवडा दूर करण्यासाठी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी करण्यात येणार्‍या मार्गांवर या बैठकीत चर्चा झाली. या उच्चस्तरीय बैठकीत अधिकार्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या काही आठवड्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, या उच्चस्तरीय बैठकीत मोंदींनी ऑकिस्जनची उपलब्धता वाढवण्यासाठी तीन उपाययोजना करण्याचे अधिकार्‍यांना सांगितले आहे. पहिला उपाय म्हणजे ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्याच्या संदर्भात, दुसरा उपाय ऑक्सिजन वितरणाची गती वाढवण्याचा आणि तिसरा म्हणजे आरोग्य सुविधांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्गांचा वेगवान पद्धतीने वापर करणे. या उच्चस्तरीय बैठकीत अधिकार्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले की, ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन आणि त्याचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकारांसोबत समन्वय साधला जात आहे. सध्यस्थितीत भारतातील २0 राज्यांना दररोज ६७८५ मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची आवश्यकता आहे, या मागणीनुसार२१ एप्रिलपासून या राज्यांना दररोज ६८२२मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, खासगी आणि सार्वजनिक पोलाद उद्योग तसेच ऑक्सिजन उत्पादकांच्या योगदानामुळे गेल्या काही दिवसांत दररोज ३३00 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती वाढली आहे. पीएसए ऑक्सिजन प्रकल्प लवकर राबवण्यासाठी राज्यांसोबत मिळून काम करत आहोत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकार्‍यांना सांगितले की, राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आणि अखंडित करावा याची काळजी घ्यावी.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.