पृथ्वीराज चव्हाणांकडे आसामची जबाबदारी |Prithviraj Chavan has the responsibility of Assam

Share This News

मुंबई : काँग्रेसने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना आसामच्या स्क्रिनिंग कमिटीचे काँग्रेसने अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. चव्हाणही G-23 नेत्यांच्या यादीत आहेत. अशात चव्हाणांना स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष बनविल्याने पक्षांतर्गत राजकारण तापण्याची शक्यता आहे.
आसाममध्ये २७ मार्चला मतदान होणार आहे. एकूण तीन टप्प्यांत येथे मतदान होणार आहे. काँग्रेसने अशातच पृथ्वीराज चव्हाणांना आसामच्या स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष बनविले आहे. चव्हाणांसोबतच रिपून बोरा आणि जितेंद्र सिंह यांनाही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, G-23 नेत्यांनी लिहिलेल्या पत्रात चव्हानांनीही स्वाक्षरी केली होती. पण, पृथ्वीराज चव्हाण गुलाम नबी आझादांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावेळी दिसले नव्हते.


काँग्रेस चव्हाण यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवून, एक प्रकारे G-23 नेत्यांना, पक्ष त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाही, असा संदेश देत असल्याची चर्चाही आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. २२ मार्चला १२६ सदस्य संख्या असलेल्या आसाम विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. अखेरच्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान ६ एप्रिलला होईल. या निवडणुकीचा निकाल २ मे रोजी लागणार आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी संपत आहे. अशात आसाममध्ये सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून प्रचार करत आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. गुलाम नबींच्या नेतृत्वात २७ फेब्रुवारीला काँग्रेसचे G-23 म्हटले जाणारे नेतेही एकत्र आले होते. यात कपिल सिब्बल, आनंद शर्मा आणि राज बब्बर यांच्यासारखे दिग्गज नेतेही होते. ग्रेस दुबळी झाली आहे, हे आपण स्वीकारायला हवे, असे सिब्बल यांनी आपल्या भाषणात म्हटले होते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.