करोनावाढीमुळे तीन जिल्ह्यांत प्रतिबंधात्मक आदेश

Share This News

नागपूर : करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा सातत्याने वाढण्यास सुरुवात झाल्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये पुन्हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. नागपूर, अमरावती आणि अकोला या तीन जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.
नागपूर शहरात करोना पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांचे प्रमाण पुन्हा एकदा दररोज पाचशे रुग्ण सरासरी होत आहेत. त्यामुळे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनीही सीताबर्डीसह शहराच्या विविध भागातील बाजारपेठेतील व्यावसायिकांनी करोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोमवारपासून व्यावसायिकांची चाचणी सुरू करण्यात आली आहे. करोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट असलेल्या भागात गर्दी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याची सूचना नागपूर पोलिस व मनपातील अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पुन्हा एकदा मास्कसंदर्भातील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
अमरावती शहरातही करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने रात्रकालीन जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घ्यावा लागेल असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले. अमरावतीमधील बहुतांश भागांत नागरिकांनी मास्कचा वापर बंद केला आहे. त्यामुळे सामूहिक प्रादुर्भाव वाढण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. अकोल्यातही सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. पुढील सूचनेपर्यंत जिल्ह्यातील शैक्षणिक व सार्वजनिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.