वरोरा शहरात भाजी मंडी चालकांकडून जनता कर्फ्युला हरताळ   

Share This News

वाढत्या कोरोणा रुग्णसंख्याला आळा घालण्यासाठी वरोरा शहर व तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असून या दरम्यान औषधी दुकाने वगळता इतर सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे निर्देश तहसीलदारांनी दिले होते. परंतु या आदेशाला शहरातील ठोक व चिल्लर भाजी विक्रेत्यांनी हरताळ फासल्याचे पाहायला मिळाले आहे. कोरोणा रुग्ण संख्येचा हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरा शहरात  तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दि.१३ ते १८ एप्रिल दरम्यान जनता कर्फ्यू ची घोषणा केली होती. या जनता कर्फ्यू मध्ये औषधीची दुकाने वगळता इतर सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा आदेश त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिले होते. या आदेशाला प्रतिसाद देत शहरातील बहुतांश व्यवसायिकांनी सोबतच किराणा व चिल्लर भाजी विक्रेत्यांनी सुद्धा आपली दुकाने बंद ठेवली होती. परंतु शहराच्या आठवडी बाजारपेठेतील काही ठोक भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने उघडून जनता कर्फ्यूला हरताळ फासल्याचे पाहायला मिळाले. या ठोक दुकानदारांचे पाहून आठवडी बाजार परिसरातील काही चिल्लर भाजी विक्रेत्यांनी सुद्धा आपली दुकाने उघडली होती. या परिसरात ठोक व चिल्लर भाजी विक्री दुकानात सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी उसळली होती. यामुळे कोरोणाची साखळी तोडण्यासाठी घालण्यात आलेल्या जनता कर्फ्यूचा फज्जा उडाल्याचे चित्र  पाहायला मिळाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.