मोदी सरकारला खाली खेचा, प्रदेशाध्यक्ष पटोले गरजले

Share This News

भंडारा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नाना पटोले यांनी आता आंदोलनांचा धडाका सुरू केला आहे. केंद्रातील भाजप सरकारला त्यांनी लक्ष्य केले आहे. काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी व मोदी सरकारच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला लक्ष्य करण्याची जबाबदारी त्यांनी खांद्यांवर घेतली आहे. त्यानुसार गुरुवारी भंडाऱ्यातून त्यांनी कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मोर्चा काढला.
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पटोले यांचे गृहजिल्हा भंडाऱ्यातील पहिलेच आंदोलन होते. त्यामुळे त्यांच्या गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलनाची ताकद दाखविण्यासाठी चांगली गर्दी जमविली होती. यावेळी बोलताना पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. इंधन, गॅस सिलिंडरचे दर वाढवून केंद्र सरकार नागरिकांना वेठीस धरत आहे. नफ्यात असलेले अनेक सरकारी विभाग विकण्याचा सपाटा मोदी आणि शहा जोडीने लावला आहे. त्यामुळे मोदी-शहा यांना सत्तेच्या खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी जनजागृती सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांची पिवळवणूक सरकारकडून होत आहे. लॉकडाउन काळात सरकारने कोणताही आधार सामान्यांना दिला नाही. उलट कंपनी कायदा, कृषी कायदा यात बदल केले. भांडवलदारांना सामान्यांची पिळवणूक करण्याचा मार्ग मोकळा करून दिला अशी टीका पेटोले यांनी यावेळी केली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.