ऑक्सिजन प्लॅन्ट च्या उभारण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट प्रशासन प्रयत्नशील

Share This News

पुणे 30 एप्रिल कोरोनाच्या रुग्णांना वेळेत ऑक्सिजन मिळावा. यासाठी ऑक्सिजनचा पुरवठाही योग्य वेळी होणे गरजेचे आहे. त्यासाठी ऑक्सिजन प्लॅन्ट उभा करण्याचा विचार सध्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डामार्फत कऱण्यात येत आहे. यासंबंधी संरक्षणमंत्रालयाशी पत्रव्यवहार देखील करण्याच्या तयारीत बोर्ड प्रशासन आहे. बोर्डाच्या सरदार पटेल रुग्णालयात दररोज 200 च्या आसपास ऑक्सिजनची गरज भासते. खडकी कॅन्टोन्मेंटने ऑक्सिजन प्लॅन्ट उभा करण्याबाबत संरक्षण मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे.
 दरम्यान, पीएम केअर फंडातून सुद्धा देशभरात ऑक्सिजन प्लॅन्टचे जाळे उभे करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर पुणे कॅन्टोन्मेंट मध्येही ऑक्सिजन प्लॅन्ट असावी. यादृष्टीने विचार विनिमय सुरू आहे. अशी माहिती पटेल रुग्णालयाच्या अतिरिक्त निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.उषा तापसे यांनी दिली. पटेल रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची व्यवस्थाही दररोज करण्यात येत आहे. वेळप्रसंगी बाहेरूनही मागविण्यात येत आहे. आरोग्य विभागाचे कर्मचार्यांना सध्या ऑक्सिजन सिलेंडर आणण्याच्या व्यवस्थेला लावले आहे. त्यामुळे जेथे ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध आहेत. त्या ठिकाणाहून आणण्यात येत आहेत. त्यासाठी अतिक्रमण विभागातील कर्मचार्यांचीही मदत घेण्यात येत आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.