पुणे : पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास अहवाल महिला आयोगाकडे

Share This News

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने लक्ष घालत त्याचा अहवाल सादर करावेत, असे आदेश पुणे पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी आतापर्यंतचा तपास आणि घटनेचा पूर्ण अहवाल महिला आयोगाला पाठवला आहे. याची एक प्रत पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनादेखील पाठवल्याची माहिती सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली. परंतु अहवालाबाबत गोपनीयता बाळगण्यात आली.दहा दिवसांपूर्वी पूजा चव्हाण हिने वानवडीतील हेवन पार्क येथील पहिल्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने प्रकरणाची चर्चा रंगली आहे. आरोप होत असतानाच, यात राष्ट्रीय महिला आयोगाने लक्ष घालून तपासाचा अहवाल पाठवण्याचे आदेश पोलीस महासंचालक नगराळे यांना दिले होते. आयोगाला ट्‌विटरवर टॅग करत दखल घेण्याची विनंती केली होती.यानुसार अध्यक्ष रेखा शर्मा यांनी पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. शर्मा यांनी 13 फेब्रुवारी रोजी पत्रव्यवहार केला होता.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.