पूजा चव्हाण आत्महत्या चौकशीसाठी अरुण राठोड पुणे पोलिसांच्या ताब्यात
पुणे: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अरुण राठोड याला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी तपासादरम्यान कमालीची गुप्तता पाळली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या त्यामध्ये अरुण राठोडचा उल्लेख आहे. अरुण राठोडला ताब्यात घेतल्यानं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गुंता सुटण्याची शक्यता आहे.