पुनीत राजकुमार यांनी केले कोरोना लसीकरण

Share This News

बंगलोर : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत प्रथितयश बहुभाषी अभिनेते आणि बहुमुखी कलाकार पुनीत राजकुमार यांनी बुधवारी कोरोना लसीची पहिली मात्रा ग्रहण करीत देशव्यापी लसीकरण कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

या संदर्भात नागरिकांना विशेष आवाहन करताना पुनीत राजकुमार म्हणाले, ”  कोरोना लसीची पहिली मात्रा ग्रहण केली. जर तुम्ही  45 वर्षापेक्षा जास्त वयाचे असाल तर कोरोना लसीकरण करून घ्या “. नुकताच पुनीत राजकुमार यांचा युवरत्न चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

देशव्यापी कोरोना  लसीकरण कार्यक्रमाचा तिसरा टप्पा 1 एप्रिल पासून  सुरु झाला असून 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लस उपलब्ध  होत आहे. याद्वारे व्यापक लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.