शहरातील सिंधी कॉलनीती घरी कापड विक्री करणाऱ्या दुकानदारसह ग्राहकांवर दंडात्मक कारवाई 

Share This News

हिंगणघाट शहरातील सिंधी कॉलनीतील एक कपडा व्यवसायिक आज कडक लॉकडाऊन असतांना देखील आपल्या घरी कापड विक्री करीत होता.याच दरम्यान गस्तीवर असलेल्या नगरपरीषद व महसूल विभागाच्या पथकाला यांची माहिती मिळताच उपविभागिय अधिकारी चंद्रभान खंडाईत, नगरपरीषदेचे मुख्याधिकारी अनिल जगताप यांच्या उपस्थितीत कोरोना नियंत्रण पथकाने कापड विक्री करणाऱ्याच्या घरावर धाड टाकली असता याठिकाणी कापड व्यवसायिक ग्राहकांना कापड विक्री करताना आढळून आला.यावेळी या कापड विक्री करणाऱ्या दुकानदार १० हजार रुपये दंड थोटावण्यात आला.तर येथे उपस्थित १२ ग्राहक बिना मास्कने आढळल्याने त्यांच्यावर सुरू दंडात्मक कारवाई करण्यात आली.हि कारवाई उपविभागिय अधिकारी चंद्रभान खंडाईत, नगरपरीषदेचे मुख्याधिकारी अनिल जगताप यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात नगरपरीषेद कोरोना नियंत्रण पथकाचे अनिल झाडे ,विशाल ब्राम्हणक ,रऊफ खाॅॅन ,सुरेश आडेपवार महेन्र्द नक्के, महसूल विभागाच्या कोरोना नियंत्रण पथकाचे आर आय  हेमने तलाठी मसाळे यांनी संयुक्तरित्या केली आहे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.