राहुल गांधींचा एल्गार, आज वायनाड येथे ट्रॅक्टर रॅली / Rahul Gandhi’s Elgar, Tractor Rally at Wayanad today

Share This News

काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार असून या वेळी ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. ही ट्रॅक्टर रॅली नव्या कृषी कायद्याविरोधात काढण्यात येणार असून यावेळी राहूल गांधी अनेक योजनांचे देखील उद्घाटन करणार आहे. शेतकरी आंदोलनाचा आज ९० वा दिवस आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात काढण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीनंतर राहूल गांधी सर्व शेतकरी आंदोलकांशी संवाद साधून त्यांना संबोधित करणार आहे. यावेळी पुन्हा ते केंद्र सरकारवर नव्या कृषी कायद्यांविरोधात निशाणा साधण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी पावणे १२ वाजेच्या दरम्यान ते मंदाद रेल्वे स्थानकापर्यंत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झालेत. यापूर्वी राहुल गांधी सकाळी ९ वाजता वायनाड येथील इनफंट जीजस शाळेत विद्या वाहिनी बससेवेचे उद्घाटन केले. त्यानंतर ११ वाजता वायनाड मधील जोसेफ शाळेतील महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण ही राहूल गांधी यांनी केले. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी पावणे १२ वाजेच्या दरम्यान ते मंदाद रेल्वे स्थानकापर्यंत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झालेत. यापूर्वी राहुल गांधी सकाळी ९ वाजता वायनाड येथील इनफंट जीजस शाळेत विद्या वाहिनी बससेवेचे उद्घाटन केले. त्यानंतर ११ वाजता वायनाड मधील जोसेफ शाळेतील महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण ही राहूल गांधी यांनी केले.

गेल्या काही महिन्याच्या अखेरीस वायनाड येथे दाखल झालेले राहूल गांधी यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात एक वक्तव्य केले होते. तेव्हा देखील राहूल गांधी चर्चेत होते. केरळमध्ये विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यापूर्वीच राहूल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे निवडणुकपूर्व वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, केरळमध्ये विधानसभेच्या १४० जागा आहेत. सध्या सीपीआय (एम) नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीचे (एलडीएफ) सरकार आहे आणि पिनाराय विजयन मुख्यमंत्री आहेत. तर मागील निवडणुकीत एलडीएफला ९१ आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वात युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) ४७ जागा आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.