अमरावती : शिरजगाव कसबा पो. स्टे. हद्दीत, जुगार अड्डय़ावर धाड

Share This News

शिरजगाव कसबा पो. स्टे. हद्दीत, जुगार अड्डय़ावर धाड

तालुक्यातील शिरगाव कसबा पोलिस स्टेशन अंतर्गत कुर्हा- कोंडवर्धा रस्त्यावरील,कुर्‍हा गावा जवळील हिन्दू स्मशान भूमीच्या निकट,खुल्या जागेवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकली.या धाडीत २ लाख, ३७ हजार, ४१0 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगारात एकूण सहा आरोपींचा समावेश होता.पैकी तिन आरोपींना अटक करण्यात आली.तर तिन आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. जुगार अड्ड्यावरील ही कारवाई,जिल्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आली. ही कारवाई १३ डिसेंबरला पेट्रोलिंग दरम्यान करण्यात आली. घटनास्थळावरून या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाला मध्ये,नगदी रुपए ५हजार ५१0, दोन जीओ मोबाईल किंमत एक हजार ९00रुपए,तिन दुचाकी वाहने किंमत २लाख ३0 हजार, तसेच जुगार खेळण्यासाठी वापरण्यात आलेली पीवळ्या रंगाची फारी व जुगार खेळण्यासाठी वापरण्यात आलेले पत्ते.असा एकूण २ लाख ४१0 रूपयाचा माल जप्त करण्यात आला. यासोबतच जुगार खेळणार्या काशिराव किसनराव आमझरे या. मासोद,सुरेश भुजंगराव नांदूरकर रा.तोंडगाव,शेख अश्फाक शेख हुसेन रा.तळेगा मोहना.यांना अटक करण्यात आली.धाडी दरम्यान जुगारातील तिन आरोपी, घटनास्थळावरून पसार झाले.हे तिनही आरोपी घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या,दुचाकी वाहनांचे मालक असल्याचे समजते.जप्त करण्यात आलेल्या दुचाकींमध्ये,एम एच २७ ए एच ६९९५ पॅशन,एम एच २७ टी २६४ पॅशन, तर एक लाल रंगाची क्रमांक नसलेली यामाहा एफ झेड,इत्यादी वाहनांचा समावेश आहे. सदर कारवाई पो.नि.तपण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली, स. पो. नि. गोपाल उपाध्याय, एच सी.त्र्यबंक मानोहरे, एन पी सी प्रमोद खर्चे,निलेश डांगोरे,पी सी प्रविन अंबाडकर ,पंकज फाटे व चालक नितेश तेलगोटे यांनी केली.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.