नागपुरात लॉनवर छापा, वऱ्हाडी चक्क पळाले

Share This News

नागपूर : सुमारे दोन हजार वऱ्हाड्यांसह आयोजित करण्यात आलेल्या लग्न समारंभावर छापा पडताच वऱ्हाडी मिळेल त्या दिशेने पळत सुटले. न्यू येरखेडा परिसरातील राज रॉयल लॉनमध्ये हा प्रकार घडला.
लॉनवर सुरू असलेल्या कार्यक्रमात दोन हजारांवर वऱ्हाडी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी छापा टाकला. पोलिस आल्याचे कळताच वऱ्हाडी मिळेल त्या दिशेने पळत सुटले. कानाकोपऱ्यातून वाट काढत वऱ्हाड्यांनी सुटका करून घेतली. याप्रकरणी पोलिसांनी लॉनमालक, वधू आणि वराच्या नातेवाइकांविरुद्ध आदेशाचे उल्लंघन, साथरोग कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन कामठातील मोहम्मद असलम मोहम्मद सिद्दीकी यांच्या दोन मुलांचे बुधवारी सायंकाळी राज रॉयल लॉनमध्ये लग्न होते. लग्नात दीड ते दोन हजार वऱ्हाडी असल्याची माहिती पोलिस उपायुक्त निलोत्पल यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कामठीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे, विशेष पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय भिसे, उपनिरीक्षक श्याम वारंगे, शिपाई चेतन जाधव, दिनेश यादव, सूरज भारती, हरीश इंगळे, रवींद्र राऊत, राजेंद्र टाकळीकर, मंगेश यादव यांनी लॉनमध्ये छापा टाकला. वऱ्हाड्यांमध्ये खळबळ उडाली. ते सैरावैरा पळायला लागले. पोलिसांनी लॉनमालक सुरेंद्र सिंग गुरुदत्त सिंग (वय ५४, रा. वैशालीनगर), मुलाचे वडील मोहम्मद असलम मोहम्मद सिद्दीकी (वय ५५, रा. संघर्षनगर), वधूचे वडील शेख निसार अन्य एका वधूचे वडील शौकत अली (रा. कोराडी) यांना ताब्यात घेतले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.