विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचे

Share This News

नागपूर : महाराष्ट्रात पुढील दोन दिवस काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याला तापमानवाढीचा चटका सोसावा लागत आहे. अकोला इथं सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अशात पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवसात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूर वेधशाळेने 11 एप्रिलपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 9 ते 11 एप्रिल दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 9 तारखेला पूर्व विदर्भात तर 10 आणि 11 ला संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.