शनिवारपर्यंत पावसाचा अंदाज, गारठा वाढला

Share This News

नागपूर
जानेवारी महिन्यात थंडीची तीव्रता कमी झाल्यानंतर बदललेल्या वातावरणामुळे फेब्रुवारी महिन्यात गारठा वाढला आहे. नागपूरसह विदर्भात झालेल्या पावसामुळे वातावरणात गारठा पसरला असून, निमित्ताने कपाटात गेलेले स्वेटर पुन्हा नव्याने बाहेर निघाले आहे. शहरात नागपूरकर स्वेटर घालून दिसून आले. दरम्यान मंगळवार पाठोपाठ बुधवारी रात्री देखील पाऊस झाल्यानंतर थंडीची तिव्रता वाढली आहे.

विदर्भातील अनेक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह विदर्भातील काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती. मंगळवारी नागपूर शहरात रात्री मेघगर्जनेसह हलका पाऊस झाला. बुधवारी सकाळीदेखील पावसाने धडक दिली. रात्री हलका पाऊसही झाला. शनिवारपर्यंत अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भ, कर्नाटक व मराठवाड्याच्या भागात समुद्र सपाटीपासून 0.९ किमीवर एक कुंड तयार होत आहे. यातून आकाशात ढग दाटून येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पावसाचे वातावरण तयार होऊन थंडीची तीव्रता वाढली आहे. पाऊस होण्याची शक्यता असल्याने परिपक्व झालेल्या हरभरा, जवस, गहू, ज्वारी, मका, करडई, तूर आणि इतर पिकांची तत्काळ काढणी व मळणीची कामे करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असे विभागाकडून शेतकर्‍यांना आधीच सांगण्यात आले होते. याव्यतिरिक्त कापूस पिकाची वेचणी राहिली असल्यास लवकरात लवकर ती आटोपती घेत सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशिरा पेरणी केलेल्या रब्बी हंगामातील पिकास आवश्यकता नसल्यास ओलित करणे पुढे ढकलावे, अशाही सूचना देण्यात आल्या होत्या. बुधवारी दिवसभर आकाशात ढग दाटून होते. कुठेही सूर्याचे दर्शन नागपूरकरांना लाभले नाही. तीव्र थंडीमुळे स्वेटर, मफलर घालून दिसून आले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.