राजभवन म्हणजे भाजपचा अनधिकृत ‘अड्डा’च : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Raj Bhavan is the BJP’s unofficial ‘hangout’: Congress state president Nana Patole

Share This News

सांगली--महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे राज्यपालपदाचा संविधानिक अवमान होत आहे. त्यांचे पक्षपाती निर्णय हे दिल्लीच्या इशाऱ्यावरून सुरू आहेत. राजभवनाला अनधिकृतरीत्या ‘भाजपचा अड्डा’ बनवले जात आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर नाना पटोले हे प्रथमच सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या समाधीवर जाऊन त्यांना आदरांजली वाहिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.