जीजेसीच्या डायरेक्टर पदी नागपुरातील प्रतिष्ठित सराफा व्यावसायिक राजेश रोकडे यांची निवड

Share This News

जीजेसीच्या डायरेक्टर पदी नागपुरातील प्रतिष्ठित सराफा व्यावसायिक राजेश रोकडे यांची निवड करण्यात आली आहे. राजेश रोकडे हे नागपुरातील प्रसिद्ध ‘रोकडे ज्वेलर्स’ चे संचालक आहेत. ‘जीजेसी’ (GJC) ही जेम्स अँड ज्वेलरीची राष्ट्रव्यापी संस्था आहे ज्यात देशभरातील नामांकित सराफा व्यावसायिक व उद्योजकांचा समावेश आहे. राजेश रोकडे हे जीजेसी च्या डायरेक्टर पदी निवड झाल्याने केवळ नागपूरचं नाही तर संपूर्ण विदर्भातील सराफा उद्योजकांच्या उत्साहाचे वातावरण असून रोकडे यांच्यामुळे विदर्भातील सराफा व्यवसाय राष्ट्रीय स्तरावर पोहचेल असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला. तर सराफा उद्योगातील समस्या त्यांच्याच मार्गदर्शनात सोडवण्यासाठी हरसंभव प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राजेश रोकडे यांनी दिले सोबतच जीजेसी च्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.