देशाच्या कल्याण आणि प्रगतीत राज्यसभेचे योगदान : उपराष्ट्रपती

Share This News

नवी दिल्ली

प्रदीर्घ जागतिक  कोरोना संकटाच्या सावलीत  राज्य सभा दिनानिमित्त  उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी  विशेष आवाहन केले. ट्वीटरद्वारे  आपल्या भावना व्यक्त करताना उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, “

3 एप्रिल 1952 या दिवशी भारतीय संसदेच्या उच्च सदन- राज्यसभेची स्थापन झाली होती. तेव्हापासून हे सदन राष्ट्रीय हित  आणि जन कल्याण अशा विषयांवर अनेक  सार्थक विमर्श आणि चर्चांचे साक्षी  राहिले.  राज्यसभा  आपल्या  प्रबुद्ध  विमर्शाच्या माध्यमातून राष्ट्राच्या  प्रगतीमध्ये योगदान करीत राहील. 

काउंसिल ऑफ स्टेट्स- राज्यांच्या परिषदेद्वारे लोकशाही मर्यादांना राज्यसभा  दृढता प्रदान करेल तसेच देशाच्या  संघीय स्वरूपास  प्रतिबिंबित करेल. या शुभप्रसंगी  सर्व माननीय राज्यसभा सदस्यांना आग्रह करतो की, वरिष्ठांच्या या सदनाच्या प्रतिष्ठेनुसार मंथनात- विमर्शात आपले सकारात्मक योगदान दयावे. देशाच्या कल्याण आणि प्रगतीत राज्यसभेचे अनेक प्रकारे योगदान आहे. “


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.