राकेश टिकैत यांच्या सभेला परवानगी नाकारली

Share This News

नागपूर : किसान महापंचायतच्या निमित्ताने शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या यवतमाळ येथे आयोजित सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र यवतमाळचे अतिरिक्त जिल्हाधिकारी ललित वऱ्हाडे यांनी शेतकरी वारकरी संघटनेचे यवतमाळ अध्यक्ष सिकंदर शहा यांना दिले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने होणारी गर्दी लक्षात घेता सभेला परवानगी नाकारण्यात आल्याचे प्रशासनाने आयोजकांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. किसान महापंचायतला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. त्यामुळे कोव्हिडचा सामूहिक प्रादुर्भाव होण्याचा धोका नाकारता येत नाही. परिणामी यवतमाळच्या आझाद मैदानावर जाहीर सभा घेता येणार नाही, असे प्रशासनाने आयोजकांना कळविले आहे. टिकैत यांच्या यवतमाळातील सभेची परवानगी नाकारल्यानंतर आयोजन समितीने नागपुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत टिकैत यांच्या नेतृत्त्वात किसान महापंचायतचा कार्यक्रम सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे. यवतमाळात सभा होणार नसली तरी अकोल्यातील कार्यक्रम अद्याप रद्द झालेला नाही किंवा त्याला परवानगी नाकारण्यात आलेली नाही, असे आयोजकांनी स्पष्ट केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.