चैत्र महिन्यातील नवमी

Share This News

चैत्र महिन्यातील नवमी , प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, या गोजिरवाण्या दिव्य बालकाचे दर्शन व्हावे म्हणून सर्व देव देवता वेगवेगळी रूपे घेवून दर्शनाला येवू लागले, ज्याला जसे दर्शन घेता येईल ते ते देव श्री रामाचे दर्शन घ्यायला येवू लागले .. सुर्यनारायण भगवान पण दर्शन घेवू लागले , इतके लोभस मोहक रूप पाहून भगवान सुर्यानारायणाचे समाधान होईना , त्या वेळी सुर्यभगवान आपल्या जागेवरून हालेचनात … इतर सर्व देवता दर्शन घेवून जात होत्या , पण “चंद्र ” मात्र दु:खी होता , सूर्य पुढे सरकेना त्यामुळे संध्याकाळ होईना , त्यामुळे चंद्राला दर्शन घेता येईना .. त्यांनी सूर्य नारायणाला खूप विनवण्या केल्या, पण सूर्य काही पुढे जाईना ..
शेवटी चंद्राने राम प्रभूंना सांगितले कि सूर्याला पुढे सरकायला सांगा, पण सूर्य भगवान त्यांचे ऐकेनात , माझे समाधान झाले कि मी पुढे जाईन, असे म्हणू लागले ..
रामप्रभूंनी चंद्राची समजूत घातली, व म्हणाले आज पासून माझ्या नावापुढे तुझे नाव लावले जाईल , “राम – चंद्र ” , आणि माझ्या पुढल्या अवतारात तुला पहिले दर्शन होईल …
राम जन्म दुपारी झाला … आणि पुढल्या अवतारात “श्री कृष्ण ” जन्म मध्यरात्री झाला ..
कृष्ण जन्म झाला तेंव्हा फक्त तिघे जागे होते .. देवकी – वसुदेव आणि चंद्र …

श्रीपाद जोशी, नृसिंहवाडी


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.