आमदार प्रकाश भारसाकळे यांना मागितली खंडणी Ransom demanded from MLA Prakash Bharasakle

Share This News

अकोला : अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना पाच कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास मुलाला आणि परिवाराला ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा मजकूर असलेले पत्र भारसाकळे यांच्या घरी आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
आमदार भारसाकळे यांचे दर्यापूर येथे निवासस्थान आहे. येथे धमकीचे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी दर्यापूर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. भारसाकळे यांच्या पत्नी नगराध्यक्ष आहेत. मुलगा विजय जिनिंग-प्रेसिंगचे संचालक आहेत. २० फेब्रुवारीला त्यांच्याकडे टपालाने पाकीटबंद पत्र आले. पाकीट उघडल्यानंतर त्यात पत्र आढळले. पोलिसात हे प्रकरण पोहोचल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला आहे. टपालाच्या पाकिटावर असलेल्या शिक्क्याच्या आधारावर पोलिसांनी हे पत्र नेमके कुठून आले, याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पाकिटावर असलेले पोस्टाचे क्रमांकही तपासण्यात येत आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.