राजभवनाकडे न जाता राष्ट्रपती भवनाला निवेदन देणार, संयुक्त किसान मोर्चाचा निर्णय
नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सोमवारी दुपारनंतर मेट्रो परिसरात ठिय्या आंदोलनाचे स्वरूप आले. सुरूवातीला राजभवानावरून गोंधळाचे वातावरण झाले होते. पण संयुक्त किसान मोर्चा एकत्र असून कोणतेही मतभेद नाहीत असे स्पष्ट करण्यात आले. राज्यपाल आम्हाला सोडून पळून गेले आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या चर्चे राजभवनात निवेदन द्यायला जायच नाही हा निर्णय झाला आहे. राजभवनात राज्यपाल नाहीत म्हणूनच संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी जाणार नाही ही भूमिका घेण्यात आली आहे. राज्यपालांना देण्यात येणारे निवेदन फाडून टाकण्यात आले. राष्ट्रपती भवनाला आता हे निवेदन पाठवण्यात येणार असल्याचा निर्णय शिष्टमंडळाने घेतला.
अपमान सहन करणार नाही आणि शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला जाणार नाही अशी भूमिका शेतकरी नेते अजित नवले यांनी स्पष्ट केली. राजभवनावर जायच नाही हा निर्णय शिष्टमंडळाने घेतला आहे. राज्यपाल पळून गेल्याचे कळाल्याने आमचा संताप झाला आहे. राज्यपालांना स्वतःहून वेळ दिली होती. आमच शिष्टमंडळ तयार संपुर्ण सहकार्य करायला तयार होते. पण राज्यपालच राजभवनात नसल्याने आता राजभवनात जायचे नाही असा निर्णय शिष्टमंडळाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. हा छत्रपतींचा महाराष्ट्र शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या कोणत्याही भाजपची दलाली सहन करणार नाही असेही शेतकरी नेते अजित नवले म्हणाले. राज्यपाल नसल्याने राजभवनात जाण्यात अर्थ नाही ही भावना
म्हणूनच आम्ही थांबलो आहोत असेही ते म्हणाले. कंगनाला भेटायला राज्यपालांना वेळ पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही ही मस्ती दुसऱ्या राज्यात चालवा असेही ते म्हणाले. त्यामुळेच जेव्हा कधी राज्यपाल येतील तेव्हा चर्चा करू असेही त्यांनी स्पष्ट केले. आजचा मोर्चा हा मोदी शहा विरोधात आहे. आजच्या मोर्चामध्ये राज्यपाल चर्चेशिवाय निघून गेल्याने शेतकऱ्यांचा अपमान झाल्याचेही शिष्टमंडलाच्या नेत्यांनी सांगितले. तसेच प्रजासत्ताक दिनी आझाद मैदानावर झेंडावंदन करणार असल्याचे शिष्टमंडळाचे प्रतिनिधी अशोक ढवळे म्हणाले. आज किसान मोर्चा हा आझाद मैदानातच थांबणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.