अजनी येथे ११ कोविड केअर कोच इनलँड कंटेनर डेपो वापरासाठी सज्ज

Share This News

मुंबई / नागपूर, २ मे : कोविड साथीच्या आजाराशी लढण्यासाठी, रेल्वेने कोच तयार केले आहेत आणि भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार कोविड केअर सेंटर म्हणून वापरले जातील.   
११ डब्ब्यांची (गैर-वातानुकूलित) रॅक आणि एक वैद्यकीय कर्मचा-यांसाठी कोच हे इनलँड कंटेनर डेपो, अजनी येथे ठेवण्यात आले असून दि. ०२.०५.२०२१ रोजी नागपूर महानगरपालिकेच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर विभाग, मध्य रेल्वे आणि आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार रेल्वे आणि नागपूर महानगरपालिकेची कर्तव्ये व जबाबदा-या असतील.  
श्री. आलोक कंसल, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर विभाग यांना एमएचएफडब्ल्यूने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. ते असेही हणाले की, हा रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य सरकारचा संयुक्त प्रयत्न आहे.  
वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या डोनींग आणि डॉफिंगसाठी, वैद्यकीय साहित्य आणि वैद्यकीय उपकरणे ठेवण्यासाठी एक कोच वापरला जाईल. बाकीचे ११ कोच कोविड केअर सेंटर म्हणून वापरले जातील जेथे प्रत्येक कोचमध्ये १६ रुग्ण म्हणजेच प्रत्येक कम्पार्टमेंट मध्ये ०२ रूग्ण (एकूण १७६ बेड) ॲडमिट केले जाऊ शकतात. प्रत्येक कोचमध्ये स्टँडसह २ ऑक्सिजन सिलेंडर्स देण्यात आले आहेत. प्रत्येक खिडकीला डास प्रतिबंधक जाळी पुरविली गेली असून प्रत्येक कोचमध्ये नऊ विंडो कूलर बसविण्यात आले आहेत.
उन्हाळ्याच्या काळात तापमान कमी करण्यासाठी कोचिंगच्या छतावर कूलिंग सिस्टम पुरविण्यात आले आहे. सर्व कोचमध्ये पाणी व विद्युत सुविधा देण्यात आल्या आहेत. कोच आणि बेडच्या वापरासाठी ठिकठिकाणी मार्गदर्शक चिन्हे देण्यात येत आहेत.
 रुग्ण आणि कर्मचार्‍यांच्या वापरासाठी पुरेशी चादर, लीननची व्यवस्था करण्यात आली आहे. अशिमटोम्याटिक किंवा सौम्य लक्षणे असलेले कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना या कोचमध्ये हलविण्यात येईल. कोणत्याही वाईट परिस्थितीत किंवा रुग्णाची लक्षणे/परिस्थिती बिघडू लागल्यास रुग्णांना तातडीने उच्च केंद्रात म्हणजेच समर्पित कोविड रूग्णालयात स्थलांतरित करण्यासाठी या डब्यांजवळ २४ X ७ रुग्णवाहिका उपलब्ध असेल. मनपाने नेमलेले वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर आणि कर्मचारी येथील कोचमधील रूग्णांना सेवा देणार आहेत. जैव-वैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी नियुक्त केलेल्या कचरा विल्हेवाट करणार्‍या एजन्सीकडून राज्य सरकारच्या अधिका-यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केले जाईल.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.