शासकीय गोदामातील गहू-तांदळाची परस्पर विक्री

Share This News

वर्धा
निनावी दूरध्वनीवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे धान्य भरलेला ट्रक पकडण्यात आला. चालक व मालक यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शासकीय गोदाम सील करण्यात आले. गोदामाची तपासणी केली तेव्हा ४३१.३१ किलो गहू कमी आढळला व १६४.५३ किलो जास्त तांदूळ आढळून आला.गोदामातून धान्याची मोठी अफरातफर झाल्याची बाब चौकशीदरम्यान पुढे आली आहे. त्यामुळे गोदाम व्यवस्थापकांला निलंबित करून अफरातफर केलेल्या वसुलीबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे रविवारी सायंकाळी सादर करण्यात आला.
देवळी येथील तहसीलदार सरवदे यांनी दिलेल्या माहितीनुसार निरीक्षण अधिकारी राजेश पुंजाल, सोपन मस्के, पोलिस उपनिरीक्षक राठोड, जमादार अंकित पाटील यांच्या चमूने १७ डिसेंबरच्या रात्री ११ वाजता वर्धा-अमरावती मार्गावरील पुलगाव टी पॉईंटजवळ एमएच ३२ क्यू १३७५ क्रमांकाचा ट्रक पकडला.त्यावेळी ट्रकचा चालक व मालक यांनी दिलेल्या माहितीनुसार २४ टन तांदूळ शासकीय गोदाम पुलगाव येथील भरल्याचे सांगितले. ट्रकमधील पोत्यावर शासकीय लोगो आढळून आल्याने तांदळासह ट्रक जप्त करून पुलगाव पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला व त्याच रात्री शासकीय गोदाम सील केले.
१८ डिसेंबरला गोदामाच्या तपासणीकरिता नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख, जिल्हा पुरवठा कार्यालयातील वानखेडे, लेखा अधिकारी राजेश पुंजाल, निरीक्षण अधिकारी सोपान मस्के, पुरवठा निरीक्षक अर्चना जांभूळकर यांनी शासकीय गोदामाची तपासणीकरिता नियुक्त करण्यात आले.
१८ त १९ डिसेंबर रोजी तपासणी केली असता तांदळाची अफरातफर केल्याचे उघड झाले. तपासणी पथकाच्या अहवालानुसार गोदामामध्ये ४३१.३१ किलो गहू कमी आढळला व १६४. ५३ किलो तांदूळ जास्त आढळून आला. त्यामुळे गोदाम व्यवस्थापक राजेश देवीदास तकवाले यांनी शासकीय गोदामातून ट्रक भरल्याचे निदर्शनास आले असल्याचा अहवाल तहसीलदार यांना देण्यात आला आहे. रविवारी पुढील कार्यवाहीकरिता प्रस्ताव जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकारी यांना पाठविण्यात आल्याचे समजते.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.