देशात चोवीस तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ,२,१७,३५३ रुग्ण आढळले

Share This News

नवी दिल्लीः देशातील कोरोनाचे संकट अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचले असून शुक्रवारी उपलब्ध झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात देशात कोरोना रुग्णांची एका दिवसातील सर्वोच्च वाढ नोंदविली गेली. तब्बल २ लाख १७ हजार ३५३ कोरोनाचे रुग्ण देशात आढळून आले आहेत.
या आकडेवारीसह देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या १ कोटी ४३ लाखांवर पोहोचली आहे. सध्या १५ लाखांच्या वर कोरोनाची सक्रीय प्रकरणे आहेत. मागील चोवीस तास ११८५ लोकांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या संसर्गापायी आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजार ३०८ वर पोहोचली असल्याचे आयसीएमआरकडून जारी झालेल्या आकडेवातून स्पष्ट करण्यात आले आहे. देशातील आकडेवारच्या एक तृतीआंश आकडेवारी महाराष्ट्रातील असून मागील आठवड्यापासून राज्यात रोज ६० हजारांवर नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्याचप्रमाणे साडेतीनशेवर मृत्यू होत आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.