वीज थकबाकीची वसुली करा अन्यथा….

Share This News

नागपुरातील महावितरण प्रादेशिक संचालकांचे आदेश

नागपूर : कोरोना काळात महावितरणने नागरिकांना अखंड वीजपुरवठा केला. आता अनेकांकडे वीजबिलाची थकबाकी झाली आहे. विनाकारण वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा पुरवठा तातडीने खंडीत करावा अन्यथा या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आदेश महावितरणच्या नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिले. कोरोना काळापासून महावितरणची आर्थिक स्थिती बिघडली आहे. वीजग्राहकांकडे कोट्यवधींची थकबाकी असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. कोरोना लॉकडाउननंतरही कंपनीने ग्राहकांकडे वसुलीसाठी तगादा लावला नाही. मात्र आता कार्यक्षम बनून शंभर टक्के वसुली करावी लागणार आहे, असे रंगारी यांनी स्पष्ट केले. रंगारी यांनी नागपूर प्रादेशिक विभागातील सर्व परिमंडळाचा आढावा घेतला. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात न बसता दौरे करावे, वसुली करावी असे त्यांनी नमूद केले. बैठकीला नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर,चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अमरावती परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप खानंदे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, उपमहाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) प्रमोद खुळे आदी उपस्थित होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.