नागपुरात कोरोना उपचारासाठी नव्या डॉक्टरांची भरती

Share This News

नागपूर : हजारोंच्या संख्येने कोरोनाग्रस्त आढळत असल्यामुळे आरोग्य यंत्रणासुद्धा अपुरी पडू लागली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता नागपुरात नव्याने डॉक्टरांची भरती होणार आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विशेषज्ञ डॉक्टर तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करण्यात येणार आहे.
नागपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विशेषज्ञ डॉक्टर तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात येणार आहे. एम.डी. पर्यंतचे शिक्षण असणाऱ्या डॉक्टरला अडीच लाख तर एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झालेल्या डॉक्टरला एक लाख रुपये मानधन म्हणून देण्यात येणार आहेत. महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या चर्चेनंतर डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे ‍निश्चित करण्यात आले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरात तर ही स्थिती अतीशय गंभीर आहे, असे स्पष्ट करण्यात आले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.