नागपुरातील कोविड हॉस्पिटलचे ऑक्सिजन सिलिंडरच्या भरवशावर | Relying on oxygen cylinders of Kovid Hospital in Nagpur

Share This News

नागपूर : कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. तुटवडा पडू नये म्हणून स्वत: जिल्हाधिकाऱ्यांना त्यात लक्ष घालावे लागले होते. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आजही पुरवठा व मागणीवर लक्ष ठेवून आहे. असे असताना, मागील तीन महिन्यांपासून मेडिकलच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवठा करणारा २० हजार क्युबिक मीटर ऑक्सिजन प्लांट मंजुरीपासून अद्यापही दूर आहे. परिणामी आजही येथील रुग्णांना सिलिंडरमधूनच ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यावर सामान्यत: रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. विशेषत: मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या अनेक रुग्णांचे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यांचा जीव वाचविण्यासाठी ऑक्सिजन थेरपी हा एक महत्त्वाचा दुवा ठरतो. म्हणूनच मेडिकलमध्ये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या प्रत्येकी ६०० खाटांजवळ ऑक्सिजनची सोय करण्यात आली. जम्बो सिलिंडरच्या माध्यमातून पाउप लाइनद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होतो. ही प्रक्रिया स्वयंचलित असली तरी कधीही धोका होण्याची शक्यता असते. याची दखल घेत मेडिकल प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात २० हजार क्युबिक मीटर ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यांत प्लांटचे कामही पूर्ण झाले; परंतु कंत्राटदाराने पेट्रोलियम अ‍ॅण्ड एक्सप्लोसिव्ह विभागाकडून अद्यापही मंजुरीच घेतली नाही. यामुळे तीन महिन्यांपासून प्लांट बंद पडला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.