चक्क मुदत संपलेल्या रेमडेसिवीरची नागपुरात विक्री!

Share This News

नागपूर : कोरोनाच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा काळा बाजार होत आहे. आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरात मुदत उलटून गेलेल्या (एक्स्पायरी डेट) रेमडेसिव्हीर इंजेक्शनची विक्री होत आहे. एक्स्पायरी डेट नमूद केलेल्या जागी नवे स्टिकर चिकटवून रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स रुग्णांच्या नातेवाईकांना विकली जात आहेत. त्यामुळे नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे.
एक्स्पायर झालेली रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स विकून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. त्यामुळे आता प्रशासन याविरोधात काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. हा प्रकार रुग्णांच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्याने खळबळ उडाली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.