रेमडेसिवीरचा घोटाळा ‘बोफोर्स’ आणि ‘कोलगेट’पेक्षाही मोठा : बॅ. विनोद तिवारी

Share This News

नागपूर- भारत सरकारच्या रसायन मंत्रालयात अंतर्गत औषध प्रशासन विभागाच्या ‘ड्रग्स प्राईस कंट्रोल अ़ॉर्डर’च्या प्रावधनात येणाऱ्या ‘राष्ट्रीय फार्मा प्राईस अथॉरिटीतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोरोना महामारीच्या काळात काही औषध कंपन्या व माफीयाद्वारा संघटित रुपाने ‘रेमडेसिविर’ आणि अन्य महाग औषधांचा घोटाळा सुरु आहे. हा घोटाळा ‘बोफोर्स’ आणि ‘कोलगेट’ घोटाळ्यापेक्षाही मोठा आहे. यात ५७ हजार कोटी रुपयांची लूट झाली असून ती अजूनही बिना रोखटोक खुली सुरू आहे, त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सीबीआय आणि ई.डी. यांच्या संयुक्त चमूद्वारे करण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ विधीज्ञ विनोद तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय अन्न व औषध प्रशासन मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा, नॅशनल फार्मा प्राईस अथॉरिटी तसेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांना निवेदनाद्वारे केली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.