रेमडेसिवीर ब्लॅक मार्केटिंग आरोपी अरेस्ट टिकर रेमडेसिवीरचा  काळाबाजार करणाऱ्या  डॉक्टरला रंगेहात केली अटक

Share This News

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर पडताच पालकमंत्री  नितीन राऊत यांच्या आदेशाने गोपनीय सूत्र लावून  त्यांनी रेमेडीसीवर ची ब्लॅक मार्केटिन्ग करणाऱ्या डॉक्टर सह ३ वॉर्ड बॉय ला अटक केली आहे , कामठी स्थित  आशा हॉस्पिटल चे डॉ. लोकेश शाहू यांना  पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करताना रंगेहात पकडले. डॉ. शाहू आशा हॉस्पिटल व छत्रपतीनगरातील एका खासगी रुग्णालयात कॉल सर्व्हिस वर काम करतात.  या कारवाही बाबत  पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसारनागपूर येथील एका परिवाराला रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता होती. त्यांनी नागपुरात शोध घेतला असता इंजेक्शन मिळाले नसल्याने त्यांना कोणीतरी कामठीत डॉ. शाहू यांच्याकडे इंजेक्शन मिळू शकते, अशी माहिती दिली. यानुसार त्यांनी डॉ. शाहू यांच्याशी संपर्क साधून दोन रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली. यावेळी त्यांना २७ हजार किंमत सांगण्यात आली. यानंतर पीडित परिवाराने ऑनलाईन २0 हजार पेमेंट केले. आणि नगदी सात हजार घेऊन इंजेक्शन खरेदी केले. याची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी बनावट ग्राहक डॉ. शाहू यांच्याकडे पाठवून दोन इंजेक्शन प्रत्येकि २५  हजारांमध्ये खरेदी करण्याचे कबूल केले. दुसरीकडे एफडीएला याची सूचना देऊन डॉ. लोकश शाहूला काळाबाजारातील रेमडेसिवीर इंजेक्शन देताना रंगेहात पकडून अटक केली. एकंरदीतच या कारवाही मुळे रेमडीसीवर ची काळाबाजार करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.