रेमडेसिवीरवरील आयात शुल्क हटवले

Share This News

नवी दिल्लीः केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि पियूष गोयल यांनी मंगळवारी सोशल मीडियावरून दोन मोठ्या निर्णयांची माहिती दिली. औषध स्वस्तात मिळण्यासाठी केंद्र सरकारने अँटी व्हायरल औषध रेमडेसिवीर आणि ते बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंवरील आयात शुल्क हटवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे.
देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिवीरची आवश्यकता पाहता केंद्र सरकारने मंगळवारी हा निर्णय घेतला आहे. याशिवाय केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना म्हणजे कोविड योद्ध्यांना गेल्या वर्षी देण्यात आलेलं विमा कवच त्यांचा इन्शुरन्स आणखी एका वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.