रिपब्लिक वाहिनीचे पत्रकार अर्णव गोस्वामी यांना मारहाण, अटक.

Share This News

मुंबई: वास्तु विशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात तब्बल दोन वर्षांनंतर कारवाई करीत मुंबई पोलिसांनी रिपब्लिक वाहिनीच्या मुंबई कार्यालयात धुमाकूळघालत, पत्रकार अर्णव गोस्वामी यांना मारहाण करीत अटक केली आहे.

चित्रपट अभिनेता सुशांतिंसह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या कारभाराचे, कार्यपद्धतीचे वाभाडे काढण्यात अर्णव गोस्वामी यांचा पुढाकार राहिला होता. त्यांनी काढलेल्या या वाभाड्यांमुळेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग झाला होता. मध्यंतरीच्या काळात त्यांनी मुंबई पोलिसांना थेट आव्हानच दिले होते. बुधवारी झालेली त्यांच्या अटकेची कारवाई हा त्याचाच परिणाम असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार, चंद्रकांत पाटील आदी नेत्यांनी अटकेच्या या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला असून, हा लोकशाहीवरचा घाला असल्याचे म्हटले आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र, राज्यात कायद्याचे राज्य असून, एखाद्याच्या विरोधात पुरावे असतील तर कारवाई होणारच. अर्णव वरील कारवाई सूडबुद्धीने झालेली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अलीबाग येथील अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडिओच्या इंटेरियर डिझाई चे काम केले होते. त्यासाठी त्यांना अर्णव यांच्याकडून पाच कोटी चाळीस लाख रुपये येणे होते. परंतु वारंवार बिल मागूनही गोस्वामी यांच्याकडून पैसे दिले जात नव्हते. त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली. अर्णव गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचा आरोप नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिले होते. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केलेल्या तक्रारीनंतर अलिबाग पोलिसांनी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी चौकशीसाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. वरळी येथील घरातून त्यांना बुधवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.