अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई – काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ज्येष्ठ सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमांचे चित्रीकरण करू देणार नाही अशी धमकी दिली आहे. त्याचा आम्ही तीव्र विरोध करतो. जर काँग्रेस पक्ष या सिने अभिनेत्यांच्या सिनेमांचे चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न करेल तर रिपब्लिकन पक्ष अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार या सिने कलाकारांना संरक्षण देईल आणि त्यांच्या चित्रपटाच्या चित्रकरणाला बाधा आणणाऱ्यांना रोखण्याचे काम पक्ष करेल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी दिला.
सेलिब्रिटी सिने अभिनेते हे पेट्रोल दरवाढी वरून केंद्र सरकार वर टीका करीत नाही, असा आरोप करून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाचे शूटिंग होऊ देणार नसल्याची धमकी दिली. हे चुकीची आहे. नाना पटोले आमचे चांगले मित्र आहेत. हिंदी मराठी चित्रपट सृष्टी ही मुंबईची शान आहे. सिने उद्योग हा मुंबईतील महत्वाचा उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगात अशी बाधा आणणे योग्य नाही. लोकशाहीत अशी धमकी देणे चुकीचे आहे. काँग्रेस पक्षाने या अभिनेत्यांचा विरोध करताना त्यांच्या सिनेमाचे चित्रीकरण बंद पडण्याचा प्रयत्न केल्यास वेळप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे कर्तकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल, असेही रामदास आठवले यांनी जाहीर केले.