आरक्षणाच्या विभाजनाशिवाय मराठ्यांना पर्याय नाहीच – हरिभाऊ राठोड

Share This News

ठाणे, १ जानेवारी, मागील सरकारने आरक्षण देताना केलेल्या चुकीमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत अडचणींचा डोंगर उभा रहात आहे. त्यावर मात करायची असेल तर आरक्षणाचे सबकॅटेग्रेशन अर्थात विभाजन हाच एकमेव उपाय आहे. आरक्षणाचे विभाजन केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळूच शकत नाही. त्यामुळे सुप्रिम कोर्टातही अडचण निर्माण होणार असल्याने आपणाशी चर्चा करुन 1994 साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सबकॅटेग्रेशन केले होते. आताही त्याचीच गरज आहे, असा दावा बंजारा-ओबीसी नेते खा. हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.  
वंचित समाजातील बाराबलुतेदार, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, बरोजगार, बचतगट, देवदासी , मजूर यांच्या प्रश्नांच्या संदर्भात हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली 5 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे मोर्चाचे आयोजन केले आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
 हरिभाऊ राठोड यांनी सांगितले की, मंडल आयोगाच्या शिफारशी देशात लागू झाल्यानंतर 27 टक्के कोटा एसईबीसीला देण्यात आला होता. राज्यात हे आरक्षण लागू करताना सबकॅटेग्रेशन करण्याची सूचनावजा विनंती आपण तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना केली होती. त्यामुळे 14 सप्टेंबर 1994 साली हा तिढा सुटला होता. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न जटील झालेला आहे. हा प्रश्न सोडवायचा असेल तर ओबीसी आरक्षणाचे सबकॅटेग्रेशन करणे अत्यंत गरजेचे आहे. अन् हे सबकॅटेग्रेशन तत्व सर्वांनाच मान्य होईल, असे आहे. या सबकॅटेग्रेशनमुळे आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादाही ओलांडली जाणार नाही. या संदर्भात सन 2014 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशीही चर्चा झालेली आहे. त्यावर केंद्रीय सामााजिक न्याय मंत्रालयाने अहवाल मागवला होता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानेही 15 मार्च 2015 रोजी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केलेला आहे. सध्याची स्थिती पाहता, ओबीचे सबकॅटेग्रेशनचे तत्व आपल्या देशांनी माान्य केले आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात अडकलेला आहे. दुसरीकडे राज्याच्या मंत्रिमंडळाने मराठा समाजााला इडब्ल्यूएसचे ऐच्छिक स्वरुपात दिलेले आहे. त्यामुळे समाजात असंतोष निर्माण झालेला असल्याने ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाला धक्का न लावता 50 टक्क्यांच्या आत एसबीसीला सामावून घेऊन त्याचवेळी त्यांचे सबकॅटेग्रेशन करुन कुणबी-मराठा समाजाला 6 टक्के, धनगरांना 3.5 टक्के, भटके यांना 2.5 टक्के, विमुक्तांना 4 टक्के, वंजारींना 2 टक्के, बारा बलुतेदारांना 4 टक्के आणि ओबीसींना 8 टक्के असे 30 टक्के आरक्षण विभागले तर एससी-एसटीचे 20 टक्के आरक्षण मिळून 50 टक्क्यांची मर्यादाही ओलांडली जाणार नाही, असेही खा. राठोड यांनी म्हटले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.