नववर्षात आत्मनिर्भर, प्लॅस्टिकमुक्त भारत, लोकल फॉर व्होकलचा संकल्प करा – पंतप्रधान मोदी

Share This News

नवी दिल्ली, २७ डिसेंबर व्होकल फॉर लोकलची भावना देशातील नागरिकांनी दृढ करण्याची गरज आहे. हे आपल्याला वाढवत राहायचं आहे. या अंतर्गत आत्मनिर्भर, प्लॅस्टिकमुक्त भारत, लोकल फॉर व्होकल, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझऱचा वापर करणारच, असा संकल्प सर्वांनी करूया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. २०२० वर्षातील हा अखेरचा कार्यक्रम होता.
यावेळी मोदींनी कोल्हापूरच्या अंजली आणि मुंबईच्या अभिषेक यांनी पाठवलेल्या संदेशाचं वाचन करत त्यांचं कौतुक केलं. 

२०२१ मध्ये भारत यशाच्या नव्या शिखरावर असेल!

मोदी पुढे म्हणाले की, २०२० या वर्षानं आपल्याला खूप काही दाखवलं आहे तसंच शिकवलं आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह २०२१ मध्ये भारत यशाच्या नव्या शिखरावर असेल आणि जगात भारताची ओळख आणखी मजबूत राष्ट्र म्हणून होईल, अशी कामना आपण करुयात. 
देशाचं सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचं कौतुक 

ते म्हणाले की, मला अनेक नागरिकांनी पत्र पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचं सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचं कौतुक केलं आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशानं करोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजूट दाखवली. हे सुद्धा अनेकांनी लक्षात ठेवलं. देशाच्या सन्मानार्थ सामान्य माणसांमध्ये झालेले बदल आपण अनुभवले आहेत. मी देशात आशेचा एक अद्भुत प्रवाहही बघितला आहे. असंख्य आव्हानं होती, संकटं पण आले. कोरोनामुळे जगभरात पुरवठा साखळीत अनेक समस्या आल्या. पण भारतानं प्रत्येक संकटात नवीन गोष्टी आत्मसात केल्या.
झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्टसह काम करण्याची योग्य वेळ
आपण #AatmaNirbharBharat ला पाठिंबा देत आहोत, पण आमच्या उत्पादकांनीही ते तयार करत असलेल्या उत्पादनांच्या गुणवत्तेशी तडजोड करू नये ही गोष्ट तर अगदी बरोबर आहे. झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्टसह या कल्पनेसह काम करण्याची ही योग्य वेळ आहे. स्टार्ट अपसाठी प्रोत्साहन आणि स्थानिक वस्तुंना बाजारपेठा मिळाव्या यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

भारतातील बिबट्यांच्या संख्येत वाढ

२०१४-१८ दरम्यान भारतातील बिबट्यांची संख्या ६० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. २०१४ मध्ये देशात बिबट्यांची संख्या सुमारे ७,९०० होती, तर २०१९ मध्ये ही संख्या वाढून १२,८५२ झाली. देशातील बऱ्याच राज्यांत, विशेषत: मध्य भारतात, बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अव्वल स्थानी आहेत. ही एक मोठी कामगिरी आहे, असेही मोदी म्हणाले.
‘मन की बात’विषयीपंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर २०१४ मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज ७२ वा भाग होता. या कार्यक्रमाचे पहिले प्रसारण ३ ऑक्टोबर २०१४ साली झाले होते. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात. २७ डिसेंबर रोजी प्रसारित झालेला ‘मन की बात’ हा कार्यक्रम या वर्षीचा शेवटचा कार्यक्रम होता.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.