गोंदियात विकेंड लाकडाऊनला प्रतिसाद,अधिकार्यांचा फ्लगमार्च

Share This News

गोंदिया,दि.10ः- आजपासून शनिवारला सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यभरात विकेंड लॉकडाऊनला सुरवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे.नागरिकांच्या सहकार्यानेच आपल्या सर्वांचे प्रयत्न यशस्वी ठरतील. लॉकडाऊनचे काटेकोर पालन करा, घरीच रहा, सुरक्षित रहा हा सल्ला देत गोंदिया शहरातील मुख्य मार्गाने आज उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण,उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे,गोंदिया शहर तहसिलदार,नगरपरिषदेचे कर्मचारी,गोंदिया शहर पोलीस निरिक्षक बनसोडे,रामनगरचे पोलीस निरिक्षक प्रमोद घोंगे,वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक तायडे यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी यांनी फ्लगमार्च काढून व्यापारी व जनतेला कोरोनाची साखळी तोडण्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले.(सर्व छायाचित्र-सतिश पारधी गोंदिया यांचे)

गोंदियात विकेंड लाकडाऊनला कडेकोट बंद मार्केट बंदचे छायाचित्र टिपलेय सतिश पारधी यांनी

गोंदिया शहरात सकाळपासूनच नागरिकांनी विकेंड लाकडाऊनला पाठिंबा दर्शविल्याने रस्त्यावरील वाहतुक निर्मनुष्य़ होती.अत्यावश्यक सेवेतील दुकाने रुग्णालय,औषधी दुकाने वगळता सर्वत्र बंद होते.त्यातच गावखेड्यातील कामानिमि्तत येणारे कामगारांनीही आज गोंदिया शहराकडे न येता गावातच थांबणे महत्वाचे समजल्याने रस्त्यावरील गर्दी दिसेनाशी झाली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.