अंत्यसंस्कारासाठीच्या उपस्थितीवरही पुन्हा मर्यादा

Share This News

नागपूर : कोरोनाच्या ‘कमबॅक’मुळे नागपुरातील ग्रामीण भागात प्रशासनाने गुरुवार, १८ फेब्रुवारीपासून पुन्हा बंधने लादली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी काढले आहेत. त्यानुसार विवाह सोहळ्यासाठी जास्तीत जास्त ५० तर अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त २० व्यक्तींच्या उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे.

प्रशासनाने गुरुवारपासून लागू केलेल्या नव्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पुन्हा एकदा कारवाई सुरू करा, असे आदेशही ठाकरे यांनी काढले आहेत. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांची ई-बैठक १६ फेब्रुवारीला झाली. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी ठाकरे यांनी नव्या प्रतिबंधात्मक आदेशांचे परिपत्रक काढले आहे. कोरोनासंदर्भात काढण्यात आलेल्या नव्या परिपत्रकाचे पालन करण्याची जबाबदारी नागपूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व उपविभागीय महसूल अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, खंड विकास अधिकारी, नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारपासून नव्या प्रतिबंधक आदेशांचे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला पालन करावे लागणार आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.