निर्बंधांची मात्रा आणखी कडक होणार,दोन दिवसांत निर्णय, पुनर्वसन मंत्र्यांची माहिती

Share This News

मुंबईः राज्यात कठोर निर्बंध लागू होऊनही परिस्थितीत फरक पडलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली असून राज्यात पुन्हा कठोर लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले असून येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी संवाद साधतान विजय वडेट्टीवार म्हणाले की, लॉकडाऊन काळात लोकांना मदत करण्याबाबत आढावा घेतला. पुढच्या आठवड्यात सगळ्यांना मदत मिळाली पाहिजे. नाभिक समाजाला मदत कशी करायची यावर विचार सुरु आहे. माहिती गोळा करून कशी मदत करायची यावर चर्चा सुरु आहे. अद्याप केंद्र सरकारने एसडीआरएफमध्ये कोविडसाठी पैसे दिलेले नाहीत. गेल्यावेळी १२०० कोटी रुपये दिले होते. मागच्या वेळी ३ एप्रिलला पैसे आले होते, पण आज १९ एप्रिल असून अद्यापही पैसे आलेले नाहीत. हे टीका म्हणून नाही, पण उशीर झाला आहे. यावर्षी त्यांच्याकडून १६०० कोटी अपेक्षित आहेत.
संचारबंदीचा फायदा सध्या पाहिजे त्या प्रमाणात झालेला दिसत नाही. आपण लॉकडाऊन केलेला नाही. अनेक व्यापाऱ्यांचा लॉकडाऊन ला विरोध होता. पण आज व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची तसंच इतर लहान दुकानं असणारेही लॉकडाऊन १०० टक्के करा अशी मागणी करत आहे. अनेक जिल्ह्यांमध्येही लोक मागणी करत असून आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. दोन दिवसांत कडक लॉकडाऊनसंबंधी निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन तो निर्णय घेतील,असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
दिल्लीने कडक लॉकडाउन केला असून त्याची माहिती आम्ही घेत आहोत. लॉकडाउन कसा आहे, त्यांची नियमावली काय आहे यावर चर्चा करण्याचा निर्णय झाला आहे,” अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.