केंद्रीय सचिवांकडून नागपूर विभागाचा आढावा

Share This News

सार्वजनिक वितरणाचे बळकटीकरण, विविध योजनांमार्फत अन्नधान्य वितरण, धान खरेदी, भरडाई (मिलिंग) भरड धान्य खरेदी, अन्नधान्य वितरण, शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला बाजारभाव उपलब्ध करणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, शेतीवर आधारित उद्योगाला चालना देणे, या मुख्य विषयांवर आज आढावा घेण्यात आलाआयुष्यमान भारत, मनरेगा व इतर सामाजिक कल्याण योजना यांची सांगड राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांशी घालण्याचे निर्देश त्यांनी दिले. गरीब, गरजू कुटुंबांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत सहभागी करून सुलभ पद्धतीने त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पोचविण्यासाठी या विभागाने कार्य करावे. केंद्र शासन शेवटच्या घटकातील नागरिकांपर्यंत सुलभतेने वितरणासाठी अत्यंत आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा जिल्हावार आढावा घेतला.

नागपूर विभागात जवळपास 650 राईस मिल्स आहेत. या सर्व मिल मालकांना विश्वासात घेऊन फोर्टी फाइड राईस, राईस ब्रॅन तेल, उद्योग यासाठी पुढाकार घेण्याचे सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना आवश्यक ती मदत देखील आपल्या विभागांमार्फत करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.अंगणवाडी व शालेय पोषण आहारांतर्गत मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. हे वितरण करताना फोर्टिफाइड राईस पुरविण्याबाबत निर्देशित करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. डिस्टेलरीमार्फत मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्माण करण्याच्या प्रक्रियेत नागपूर विभागाचा सहभाग आणखी सक्रियतेने आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मका उत्पादनात विभागात वाढ करावी, अशी सूचना त्यांनी केली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.