चहाच्या निर्यातीत वाढ व भाववाढ वृद्धीचा उच्चांक

Share This News

टी बोर्ड दवारा प्रसारित आकड्यानुसार मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षातील पहिल्या 10 महिन्यांतमत चहाच्या निर्यातीमध्ये 6.7% वृद्धि झालेली आहे. नाग विदर्भ टी मर्चंट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य प्रशांत अहिरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे कळवले आहे. जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यातंर्गत चहा 1896.8 लाख किलोग्राम निर्यात करण्यात आलेला आहे परंतु या तुलनेत मागील वर्षी जवळपास 1780 लाख किलोग्राम चहा निर्यात करण्यात होता. मुल्य आधारावर चहा निर्यात वाढून 3724.34 कोटी रूपये झाला आहे. जे मूल्य आला मागील वर्षी 3553.19 कोटी रूपये झालेले होते जेणे करून चहाचा दर कमी होऊन 196.35 रूपये होता. आकड्यानुसार 374.6 ला किलो रशीया येथे निर्यात झाला. इतर प्रमुख आयात करणाया देशांपैकी इराण 209.8 लाख किलोग्राम, युएई 140.8 लाख किलोग्राम, यूएसए 113 लाख किलोग्राम आणि यूके 112 लाख किलोग्राम या देशांनी भारतीय चहा खरेदी केलेला आहे. देशांतर्गत मागणी सुदधा चांगली असून विविध फ्लेवर, जसे इलायची चहा, ग्रीन टी, चॉकलेट चहा, तसेच इंस्टंट चहा सुद्धा वापरण्याचा चहा शौकीनांचा कल दिसतो. मागणी जास्त व उत्पादन कमी असल्यामुळे चहाचे भाव आकाशाला भिडले आहे. ब्रांडेड कंपनीने भाव प्रतिकिलो 400/- ते 660/- पर्यत गेले असुन गरिबांचा चहा महाग झाला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.