कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा धोका

Share This News

नव्या स्ट्रेनच्या कोरोना विषाणूचे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले असून नागरिकांनी ‘आरटीपीसीआर’ ही तपासणी प्राधान्याने करण्याची गरज आहे. ब्रिटेन, दक्षिण आफ्रिका व ब्राझिल येथील नवीन स्ट्रेनचे रुग्ण आढळल्यामुळे यासंदर्भातील उपचाराबाबत प्रोटोकॉल तयार करावा. त्यासंदर्भातील संपूर्ण माहिती जनतेला उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.
कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नागपुरात कुठलेही स्थानिक निर्बंध १ एप्रिलपासून राहणार नाही. मात्र राज्य शासनाने २७ मार्च रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार रात्रीची जमावबंदी राहणार असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जाहीर केले.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन लागणार की काय? याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. याला भाजपासह अन्य पक्ष, व्यापारी, व्यावसायिकांनीही विरोध केला होता. लॉकडाऊनमुळे मोठय़ा प्रमाणात समस्या निर्माण होतात. शिवाय लॉकडाऊन हा पर्याय नव्हे तर कोरोना प्रतिबंधासाठी अन्य उपाययोजना कराव्या. आरोग्यसेवा बळकट करावी, अशीही भूमिका मांडली जात होती. दरम्यान, नागपुरात यापूर्वी लावण्यात आलेल्या निर्बंधांची मुदत ३१ मार्चपर्यंत होती. बुधवारी, ३१ मार्च रोजी पालकमंत्री नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. त्यात स्थानिक निर्बंध रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.