अभिनेत्री कंगणाच्या ट्विटवरुण नागपुरात हाणामारी

Share This News

नागपूर: अभिनेत्री कंगणा राणौत यांच ट्विटर वर समर्थन केल्याने शिवसेना कार्यकर्ता करण तुली यांनी मारहाण केल्याचा आरोप शहरातील आरजे प्रीतम सिंग यांनी केला आहे. तर प्रीतम सिंग यांनीच दारूच्या नशेत मित्रांसाह मारहाण केल्याचा दावा करण तुली यांनी केला आहे. दोन्ही पक्षांनी याबाबत कपिल नगर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. शिवसेना नेत्यांवर ट्विटर च्या माध्यमातून अनेकदा टीका करून अभिनेत्री कंगणा राणौत अनेकदा चर्चेत असते. आता अभिनेत्री कंगणाचे ट्विट रिट्विट केल्याने नागपुरात चक्क हाणामारीची घटना घडलिया. प्रीतम सिंग हा सुरवातीला रेडियो जॉकी म्हणून काम करायचा. आता तो मुंबईला टीव्ही मालिकांमध्ये काम करतो. काही महिन्यांपूर्वी प्रीतम सिंग ने कंगणाचे ट्विट रिट्विट केले होते. तेंव्हापासून करण तुली यांच्या मनात राग होता. मित्राने मध्यस्थी करून प्रीतम सिंग ला आटोमोटीव चौकात बोलाऊन घेतले व मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. परंतु याप्रकरची कुठलीही मारहाण आपण केली नसून प्रीतम सिंग केवळ प्रसिद्धीसाठी हे सर्व करीत असल्याचा आरोप करण तुली यांनी केला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.