रोपवे व प्रवासाची इतर साधने आता रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या अधीन
रोपवे आणि प्रवासाची इतर सर्व साधने आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रायलयाच्या अंतर्गत येणार आहे, यासंबंधीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या नव्या निर्णयामुळे या क्षेत्रात संशोधन व नवीन तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध होऊन या क्षेत्राला चालना मिळेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. या नव्या निर्णयानुसार या क्षेत्रात बांधकाम,संशोधन आणि धोरणाची जबाबदारी हि मंत्रालयाची राहणार आहे. दुर्गम स्थानासाठी वाहतुकीचा पर्याय म्हणून रोपवे कडे पाहण्यात येतं. या नव्या धोरणानुसार आता अतिदुर्गम भागातही रोपवे चा वापर करून नागरिकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल.